Police Bharti 2024 | पोलीस भरती 2024 बद्धल संपूर्ण माहिती : आजकाल प्रत्येक खेडेगावातील ,शहरातील युवक – युवती पोलीस विभागामध्ये नोकरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणत परिश्रम घेताना दिसतात. त्यापैकी काहीजणांना पोलीस भरतीची प्रक्रिया नेमकी कश्या प्रकारे पूर्ण केली जाते हे माहित आहे .तर काहीजण नुकतेच या वर्षापासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसते .
हि पोलीस भरती प्रक्रिया नक्की कशा प्रकारे पूर्ण केली जाते व कोण – कोणत्या स्टेप प्रक्रियेमध्ये असतात ,कागदपत्रे कोण कोणती लागतात , उमेदवाराचे वय किती लागते ,शिक्षण ,पात्रता यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे व माहिती तुम्हांला या लेखामार्फत मिळेल तरी संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा .
Police Bharti 2024 | पोलीस भरती शिक्षण
पोलीस भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही विद्यापिठातून 12 वी उत्तीर्ण झालेला असावा .
पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- दहावी ,बारावी चे गुण पत्रक व बोर्ड सर्टिफिकेट
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र ( दोमेसाइल )
- शाळा ,कॉलेज सोडल्याचा दाखला ( L.C )
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर
- महिलांसाठी – लग्न झाल्यास गॅजेट कॉपी
- चालक पदासाठी – वाहन चालक परवाना
- भूकंपग्रस्त असल्यास – भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त असल्यास – प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- माजी सैनिक डीचार्ज प्रमाणपत्र
Police Bharti 2024 | शारिरीक पात्रता
👉 महिलांसाठी शारीरिक पात्रता 👈
उंची : 155 से.मी पेक्षा जास्त
👉 पुरुष शारीरिक पात्रता 👈
उंची : 165 से.मी पेक्षा जास्त
छाती : 79 से.मी ( न फुगवता )
84 से.मी पेक्षा जास्त ( फुगवून )
Police bharti physical marks | पोलीस भरती मैदानी चाचणी गुण 2024
पोलीस भरतीमध्ये प्राथमिकता मैदानी चाचणी हि काही पदांसाठी 50 गुणांची असते तर काही पदांसाठी 100 गुणांची असते . हे गुण वेगवेगळ्या चाचण्यांच्या प्रकारामध्ये विभागले गेलेले असतात .त्यामध्ये गोळा फेक , 1600 मीटर धावणे , 100 मीटर धावणे , महिलांसाठी 800 मीटर धावणे .
गुण विभागणी खालीलप्रमाणे ( पुरुष उमेदवार )
चाचणी गुण
100 मीटर धावणे 15 गुण
1600 मीटर धावणे 20 गुण
गोळा फेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण
Police Bharti 2024 गुण विभागणी खालीलप्रमाणे ( महिला उमेदवार )
चाचणी गुण
800 मीटर धावणे 30 गुण
गोळा फेक 20 गुण
एकूण गुण 50 गुण
SRPF पदासाठी गुण विभागणी खालीलप्रमाणे ( पुरुष उमेदवार )
चाचणी गुण
5 किलो मीटर धावणे 50 गुण
100 मीटर धावणे 25 गुण
गोळा फेक 25 गुण
एकूण गुण 100 गुण
हेही वाचा 👉 लाडकी बहिण योजनेचे पैसे या तारखेला मिळणार 👈